वालचंदनगर (ता. इंदापूर) – वालचंदनगर पोलीस ठाणे (ISO मानांकन २०१५) येथे १५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीने “अमली पदार्थ विरोधी जनजागृती” मोहिमेअंतर्गत वालचंदनगर ते आनंदनगर दरम्यान बॅनर घेऊन प्रभावी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. “अमली पदार्थांना विरोध” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक तसेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमास खास आकर्षण म्हणून ग्रामविकास मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सुपुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती लाभली. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली, गणेश काटकर शिक्षण संस्थेचे वसंत मोहोळकर, सरपंच रोहित मोहोळकर, उपसरपंच सुधाकर कणसे, उद्या देशमुख, संतोष कांबळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
