Growing Maharashtra : पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिका आणि इतर महत्त्वाच्या स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत युतीबाबत अनिश्‍चितता वाढली असून अजित पवार गट स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे.

पुण्यात मोठी बैठक, कार्यकर्त्यांना आदेश
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवकांना स्पष्ट संदेश दिला – “सर्व जागांवर लढण्याची तयारी ठेवा. युती होईल की नाही, याचा विचार आत्ता करू नका. निवडणुकीला तीन महिने बाकी राहतील तेव्हाच अंतिम निर्णय घेऊ”. यामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवर सर्व सुरूक्षा आणि संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे.

स्वबळावर महापौरचा निर्धार
राष्ट्रवादीची प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होता येईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. “महायुतीत लढून नुकसान करून घेण्याच्या ऐवजी स्वबळावर लढू आणि आपलाच महापौर घडवू” असं त्यांनी सांगितलं.

भाजप आणि महायुतीसमोर नवे आव्हान
भाजपसह महायुतीच्या इतर घटक पक्षांना ही स्थिती डोकेदुखीची ठरू शकते. पुणे हे अजित पवारांचा पारंपरिक बालेकिल्ला मानले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत असल्यास भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात दर्शवली जात आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क ९०११६३९१६३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!