Growing Maharashtra : सांगली प्रतिनिधी
सांगली, ३१ ऑगस्ट २०२५: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. मतचोरीच्या मुद्द्यावरून पाटील यांनी पडळकरांना लक्ष्य करताना म्हटलं, “माझा प्रॉब्लेम काय आहे की मी मंगलसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही.
पण मुद्दा काय आहे, मतचोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या.” या वक्तव्यातून त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राज्य सरकार आणि पडळकर यांच्यावर निशाणा साधला.पाटील यांनी पुढे सांगितलं की, मतचोरीच्या आरोपांवर ठोस कारवाई व्हायला हवी आणि जिथे असे प्रकार घडले, तिथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली.
त्यांच्या या वक्तव्याने सांगलीतील राजकीय वातावरण तापलं असून, येत्या काळात यावरून राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील यांच्या या टीकेला पडळकर आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बातमी आणि जाहिरातसाठी संपर्क : ९०११६३९१६३
