Growing Maharashtra : विशेष प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “तूच खातो का सगळं रेटून?” असं तिखट वक्तव्य करत जरांगे यांनी भुजबळांवर मराठा आरक्षणाला विरोध करून समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून हा वाद पेटला आहे. जरांगे यांनी भुजबळ यांच्या विरोधी भूमिकेला स्वार्थी ठरवत, त्यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण होत असल्याचा दावा केला.दुसरीकडे, भुजबळ यांनी मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असं म्हणत कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यास विरोध दर्शवला आहे.
यामुळे दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमक तीव्र झाली असून, मराठा समाजाच्या आंदोलनाला नवं वळण मिळालं आहे. जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी दर्शवली असून, सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टातही प्रलंबित असून, येत्या काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क : ९०११६३९१६३
