Growing Maharashtra प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी चिंचवड – दिनांक 27 सप्टेंबर रोजी पिंपरी गाव परिसरात घडलेल्या अपघातात एका महिलेचा जीव धोक्यात आला होता. भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली व चालक पसार होण्याचा प्रयत्न करीत होता.
त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुवर्णहृदयी समाजसेवक सुहास कुदळे यांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. एवढेच नाही तर जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तिचा जीव वाचवला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कुदळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “त्यांच्या धाडसामुळे हिट अँड रन सारखा गंभीर गुन्हा रोखला गेला व एका कुटुंबाचा आधार वाचला,” असे नागरिकांनी सांगितले.

सामाजिक, शैक्षणिक व मदतकार्य क्षेत्रात नेहमी आघाडीवर राहणारे सुहास कुदळे हे विविध उपक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचतात. आपत्तीग्रस्तांना मदत असो, रक्तदान शिबिरांचे आयोजन असो वा गरजूंना आर्थिक-सामाजिक आधार देणे असो, कुदळे नेहमीच तत्पर असतात.
त्यांची समाजाभिमुख वृत्ती, तत्परता व जबाबदारीची जाणीव हीच त्यांची खरी ओळख बनली आहे. त्यामुळे आज या घटनेच्या निमित्ताने सुहास कुदळे यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.
