Growing Mahrashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: गणेश नारंग
भाजप युवा नेते कुणाल साठे व भाजप युवा मोर्चाचे ॲड. मंगेश नढे यांच्या पुढाकाराने विधानपरिषद आमदार श्री. अमितजी गोरखे व भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री. दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) रोजी भोसरी येथील पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप व निधीदान कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे युवा नेते कुणाल साठे व भाजप युवा मोर्चाचे ॲड. मंगेश नढे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरी पांजरपोळ गोशाळेला ₹५१,०००/- इतका निधी प्रदान करण्यात आला.या प्रसंगी गोशाळेचे ट्रस्टी श्री. अभय बोत्रा, गोरक्षक निलेश चासकर, गौरव कुदळे, पराग ढोरे, सुहास साळुंखे, आकाश पारडे, दिग्विजय झांजुर्णे, राहुल सुखवानी, तुषार कटके, पांडुरंग निकम, प्रतीक रामगुडे, धीरज सरवदे, दीपक करजखेड, ओंकार पवार तसेच अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते व गौसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आमदार श्री. अमितजी गोरखे व श्री. दिनेश यादव यांच्या समाजकार्यातील सक्रिय सहभाग, गौसेवा व धर्मसेवेतली निष्ठा, तसेच भाजप युवा नेत्यांचा समाजसेवेतील पुढाकार यांचे मनापासून कौतुक केले.या सामाजिक उपक्रमाद्वारे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाला गोरक्षण, पर्यावरण आणि जनसेवेचा सुंदर संदेश देण्यात आला. हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरला असून, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गौसेवेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना दिली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8793981432
