GROWING MAHARASHTRA

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

राजकारणात साधेपणा आणि पर्यावरणाची जपणूक यांचा प्रभावी संदेश देत हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी वेगळ्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही गाजावाजा, मिरवणूक किंवा वाहनांचा ताफा न घेता ते थेट सायकलवरून निवडणूक कार्यालयात पोहोचले आणि आपला अर्ज सादर केला.

त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले असून, पर्यावरणपूरक विचारसरणीची सकारात्मक चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधून अधिकृत उमेदवार म्हणून डब्बू आसवानी रिंगणात उतरले आहेत. याच वेळी श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे, निकिता अर्जुन कदम आणि सौ. प्रियांका कुदले यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, मागील कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांबाबत जनतेत समाधान असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, युवकांसाठी उपक्रम तसेच महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांतील कामांमुळे डब्बू आसवानी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.

सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणे आणि अडचणीच्या वेळी तत्काळ मदत करणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे नागरिक सांगतात.फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून विकास साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. साधेपणा, पारदर्शकता आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन हे नेतृत्व प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुन्हा सज्ज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!