Growing Maharashtra

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

काळेवाडीत शिवसेनेचं वादळ पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक २२ मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य २-व्हीलर बाईक रॅलीने संपूर्ण परिसर भगवामय झाला.या रॅलीदरम्यान शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

“जय भवानी – जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “धनुष्यबाणाचा विजय असो”अशा घोषणांनी काळेवाडी परिसर दणाणून गेला.या प्रचार दौऱ्यात शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळताना दिसून आला. विशेषतः काळेवाडीतील ॲड. मंगेश नढे व इतर तीन उमेदवारांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वतः प्रचार मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत झालेली ही बाईक रॅली केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, शिवसेनेच्या विजयाचा स्पष्ट संदेश देणारे शक्तिप्रदर्शन ठरली. शिवसेनेच्या अधिकृत धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी परिसरात शिवसेनेचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, या प्रचार दौऱ्यामुळे शिवसेनेची आघाडी अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.या प्रचारात प्रभाग क्रमांक २२ मधीलसुनिता विजय सुतार (२२-अ),अनिता बालाजी पाचाळ (२२-ब),सुनील पांडुरंग पालकर (२२-क)आणि ॲड. मंगेश नढे (२२-ड)यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.काळेवाडी शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, शिवसेनेची बाजू सर्वात मजबूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

One thought on “काळेवाडीत शिवसेनेचे वादळ ! ॲड. मंगेश नढे यांच्यासह इतर तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम थेट मैदानात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!