इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP – अजित पवार गट) विविध गणांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा आणि मागण्या जोर धरत आहेत. राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १६ जानेवारी २०२६ पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बापूराव शेंडे

काटी गण (पंचायत समिती) :
राष्ट्रवादीचा मजबूत आधार असलेल्या काटी गणात बापूराव शेंडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरकुटे खुर्द गावचे विद्यमान सरपंच असलेले बापूराव शेंडे हे माळी समाजाचे नेते आहेत. त्यांच्या पत्नी स्वाती शेंडे या पूर्वी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत. काटी गणात माळी समाजाचे मताधिक्य असून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विधानसभा निवडणुकीत या समाजाने मोठा पाठिंबा दिला होता. पक्षाने अनुभवी नेत्याला प्राधान्य देत बापूराव शेंडे यांना ‘काटी गणाचा शिलेदार’ म्हणून मैदानात उतरवण्याची तयारी दाखवली आहे.

अमोल करे
रुपाली सरक

लाखेवाडी गण (पंचायत समिती) :
या गणात मागास प्रवर्गासाठी महिला आरक्षण असल्याने रूपाली संपत सरक यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आहे. खोरोची येथील रूपाली सरक या ग्रामपंचायत सदस्य असून, त्यांचे पती संपत भीमराव सरक हे खोरोची विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. रूपाली सरक यांनी लाखेवाडी गणातील विविध गावांमध्ये भेटीगाठी सुरू केल्या असून, त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

या सर्व गणांमध्ये इंदापूरचे आमदार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादी पक्ष मजबूत स्थितीत असून, स्थानिक समाजाच्या समीकरणांनुसार उमेदवार निवडण्यावर भर दिला जात आहे. लाखेवाडी, काटी आणि बिजवडी गणांसह इंदापूर तालुक्यातील इतर गणांमध्येही इच्छुक कार्यकर्त्यांचे मोर्चे बांधणी सुरू आहे. निवडणुकीच्या निकालावर स्थानिक राजकारणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क ९०११६३९१६३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!