Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गणेश नारंग
पिंपरी कॅम्प परिसरात बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी गुरुपुरबचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शीख धर्माचे संस्थापक व मानवतेचे मार्गदर्शक श्री गुरु नानकदेवजी यांच्या ५५६ व्या जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र अध्यात्मिक आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
“एक ओंकार सतनाम” या अमर संदेशातून एकता, समानता, सद्भावना आणि सेवा-समर्पणाची भावना उजळून निघाली. “वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरूजी की फतह” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
पिंपरी कॅम्प येथील श्री गुरुनानक दरबार ग्यानीजी गुरुद्वारा येथे सकाळी अखंड गुरु ग्रंथ साहिब पठण, शबद-कीर्तन, अरदास आणि प्रवचनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. गुरुद्वाराचे आकर्षक सजावट आणि भाविकांच्या सहभागामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. धार्मिक विधीनंतर उपस्थित भाविकांसाठी लंगर प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी हिंदुश्री समाजसेवक कुणाल साठे यांचा गौरक्षण व हिंदू धर्मकार्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल गुरुद्वारा समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे सामाजिक सौहार्द, बंधुता आणि परस्पर सेवा भावाचा सुंदर संदेश समाजात पोहोचला.

गुरुपुरब निमित्त सर्वांनी सेवा, प्रेम आणि मानवतेचा संकल्प करत गुरु नानकदेवजींच्या शिकवणींना वंदन केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8793981432
