Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

जय श्रीरामच्या जयघोषात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने पिंपरी चिंचवड शहरात हिंदू समाजाच्या उद्योगजागृतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. “हिंदू माणसाची स्वतःची बेकरी” या विचारातून उभारलेली ‘कृष्णा हिंदू बेकरी’ ही आत्मनिर्भरतेचा, स्वाभिमानाचा आणि गुणवत्ता-जागरूकतेचा प्रतीक ठरली आहे.

गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता, तळवडे येथील ज्योतीबा नगरमध्ये या बेकरीचा भव्य शुभारंभ झाला. श्री गणेश पूजन, फुलांचा वर्षाव आणि “जय श्रीराम”, “हर हर महादेव”च्या घोषणांनी परिसर भक्तिभाव, उत्साह आणि हिंदुत्वाच्या अभिमानाने दुमदुमला.

हिंदुश्री कुणाल साठे

‘कृष्णा हिंदू बेकरी’चे संस्थापक हिंदुश्री कुणाल दिलीप साठे आणि कृष्णा दिपक माळवे यांनी सांगितले की, “आज अनेक ठिकाणी बेकरी व्यवसायात निकृष्ट दर्जा दिसतो. म्हणून आम्ही ठरवलं की, हिंदू माणसाने स्वतःचा उद्योग उभारावा, गुणवत्ता राखावी आणि समाजाला रोजगार द्यावा. ‘कृष्णा हिंदू बेकरी’ ही फक्त व्यवसायाची जागा नाही, तर हिंदू आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे.” त्यांच्या या विचारांना स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि युवकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदुत्ववादी आमदार मा. श्री. महेश दादा लांडगे तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास गोरक्षक मिलिंद भाऊ एकबोटे, समीर कुलकर्णी, हेमंत हरहरे तसेच अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीने आणि जयघोषांनी वातावरण मंगलमय झाले.

उपस्थित मान्यवरांनी ‘कृष्णा हिंदू बेकरी’च्या माध्यमातून सुरू झालेल्या या नव्या वाटचालीचे कौतुक करत म्हटले की, “स्वतःचा उद्योग उभारणं म्हणजे समाजउन्नतीचं पहिलं पाऊल आहे. या तरुणांनी दाखवलेली दिशा समाजासाठी प्रेरणादायी आहे.” कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी बेकरीच्या उत्पादनांचा आस्वाद घेतला आणि संस्थापकांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

‘कृष्णा हिंदू बेकरी’ ही केवळ एक व्यावसायिक संस्था नसून, हिंदू समाजातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणारा उपक्रम आहे. गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि हिंदू संस्कार यांच्या आधारे उभारलेली ही बेकरी “हिंदू उद्योग — हिंदू समाजासाठी” या तत्त्वाचा जिवंत आदर्श ठरली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8793981432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!