Growing Maharashtra प्रतिनिधी गणेश नारंग

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी काळेवाडी येथे भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे माजी सहसचिव ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान दादांनी नढे कुटुंबीयांची आत्मीयतेने विचारपूस केली तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांविषयी दाखवलेली आपुलकी आणि जिव्हाळा यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, सरचिटणीस श्री. मोरेश्वर शेडगे, श्री. सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. अजित कुलथे, शहराध्यक्ष श्री. दिनेश यादव, तसेच माजी नगरसेवक विनोद नढे, नीता ताई पाडाळे, विलास पाडाळे, काळुराम नढे, हर्षद नढे, विनोद तापकीर, रमेश काळे, सयाजी आप्पा नढे, ज्ञानेश्वर नढे, कुणाल साठे आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन ॲड मंगेश नढे युवा मंच यांच्या वतीने’, काळेवाडी, येथे करण्यात आले होते.या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ॲड. मंगेश नढे आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीत असल्याने या भेटीमुळे त्यांना संघटनातून मोठी ताकद व प्रेरणा मिळाल्याचे मानले जात आहे.

या प्रसंगी बोलताना ॲड. मंगेश नढे म्हणाले
“मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या घरी येऊन दाखवलेले प्रेम आणि आत्मीयता ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने काम करू.”

काळेवाडी परिसरात या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8793981432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!