Growing Maharashtra

पुणे : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कंपनी कडून अनेक परवानग्यासह आर्थिक अपहार, प्रदुषण व फसवणूक तसेच शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी या कंपनीवर कारवाईचा मोठा बडगा उचलला जाणार असल्याचे समजते.

इंदापूर मधील हि कंपनी गेली अनेक वर्षांपासून सुरू असुन या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन या परीसरातील पाण्यावरती याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.तर या जलप्रदूषणामुळे परीसरातील जलचर प्राणी यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत त्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.तसेच या कंपनी कडून आर्थिक गैरव्यवहार करत स्वहित साधुन शासनाची दिशाभूल करत फसवणूक केली असल्याचे देखील स्पष्ट होत आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परीसरात असलेल्या या कंपनी विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या असून या कंपनी विरोधात परीसरातील सर्व सामान्य नागरिक व शेतकरी वर्गा मधुन सातत्याने रोष व्यक्त केला जात आहे.याबातीत एका सामाजिक व राजकीय नेत्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर या कंपनी बाबतीत अनेक मोठे व धक्कादायक गौप्यस्फोट केले असून लवकरच या कंपनीवर शासकीय स्तरावरून कारवाईचा बडगा उचलण्यात येईल असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!