Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

प्रभाग क्रमांक 21 मध्ये महिलांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा “खेळ रंगला पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम येत्या रविवार, 23 नोव्हेंबर रोजी नवं महाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडणार आहे. समाजकारणात सक्रिय, कार्यतत्पर आणि लोकसहभागातून प्रभागाचा विकास साधणारे समाजसेवक कुणाल दिलीप साठे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून महिलांमध्ये याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महिलांच्या आनंदासाठी परंपरागत खेळ, मनोरंजन आणि आकर्षक भेटवस्तूंचा संगम असलेला हा कार्यक्रम विशेषतः प्रभागातील महिला भगिनीसाठीच आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे भव्य लकी ड्रॉ, ज्यामध्ये सहभागी महिलांना स्कूटी, फ्रीज, एलईडी टीव्ही, शिवण मशीन, वॉशिंग मशीन, कपाट, ओव्हन, कुलर, मिक्सर यांसारखी उपयुक्त आणि मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या सुरेल आवाजातील संगीत कार्यक्रमाची विशेष मांडणी करण्यात आली असून महिलांसाठी हा कार्यक्रम अधिकच अविस्मरणीय ठरणार आहे.

आयोजक कुणाल साठे म्हणाले,
“प्रभागातील महिलांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा आणि विश्वासाचा वर्षाव केला आहे. त्यांचा आनंद, सहभाग आणि प्रगती हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी सणासारखा आनंदाचा हा उपक्रम आयोजित करताना मला अत्यंत आनंद होत आहे.”

पिंपरीगाव, वैभवनगर, मिलिंदनगर, अशोक टॉकीज परिसर, पिंपरी कॅंप या संपूर्ण प्रभागातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8793981432

2 thoughts on “समाजसेवक कुणाल साठे यांच्या पुढाकाराने पिंपरीगावात “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे भव्य आयोजन”
  1. I know this if off topic but I’m looking into
    starting my own weblog and was wondering what all is
    required to get set up? I’m assuming having a blog
    like yours would cost a pretty penny? I’m not very internet smart so I’m not 100% certain. Any suggestions or advice would be
    greatly appreciated. Thank you

  2. Woah! I’m really loving the template/theme of this blog.

    It’s simple, yet effective. A lot of times it’s very hard to get that “perfect balance” between usability and visual appearance.

    I must say you’ve done a superb job with this. Also,
    the blog loads extremely quick for me on Firefox. Superb Blog!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!