GROWING MAHARASHTRA
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक २२ मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत, उत्साहपूर्ण वातावरणात आपल्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला.
वेळी शिवसेनेचे उमेदवार ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत आक्रमक भूमिका मांडली. प्रचार सभेला संबोधित करताना ॲड. नढे म्हणाले,
“ही निवडणूक म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढा आहे. काळेवाडीतील मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असून निवडून आल्यानंतर त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेची प्रत्येक अडचण, प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून काम करू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेकडून
ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे
(सर्वसाधारण पुरुष)
श्री. सुनील पांडुरंग पालकर
(सर्वसाधारण पुरुष)
सौ. विजया विजय सुतार
(अनुसूचित जाती महिला),
सौ. अनिता बालाजी पांचाळ (सर्वसाधारण महिला)
हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सर्व उमेदवारांनी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ॲड. मंगेश नढे यांनी प्रभागातील रखडलेली विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा व नागरी प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत “लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारा लोकप्रतिनिधी” म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले.

प्रचार शुभारंभाच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काळेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, पारदर्शक कारभार आणि प्रभावी लोकप्रतिनिधित्व यावर भर दिला.
“जनतेचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि शिवसेनेच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व” हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख सूत्र असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.
या उत्साहपूर्ण प्रचार शुभारंभाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला भक्कम बळ आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
