Growing Maharashtra

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : गणेश नारंग

शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील अधिकृत व विश्वासार्ह उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेला भव्य रोड शो व जाहीर सभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले, कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि विकासाची स्पष्ट दिशा मांडणारे उमेदवार या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले.

या प्रचार कार्यक्रमासाठी १) ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे,२) सुनील तात्या पालकर,३) विजया विजय सुतार,४) अनिता बालाजी पांचाळयांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला.राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. रोड शोदरम्यान प्रभागातील विविध भागांतून रॅली काढण्यात आली.

ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहारांनी स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.यानंतर झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेची विकासाभिमुख भूमिका, संघटनात्मक ताकद तसेच प्रभाग क्रमांक २२ च्या सर्वांगीण विकासासाठीचा ठोस संकल्प मांडण्यात आला.

हे सर्व उमेदवार सामान्य कार्यकर्त्यांतून पुढे आलेले असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारे नेतृत्व असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य रोड शो आणि जाहीर सभेमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानत, आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!