xr:d:DAFwGP-Xtg4:17,j:4876677253885209805,t:23100215

इंदापूर, दि. १० ऑगस्ट २०२५: छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढी आणि समाधीस्थळावर झालेल्या अतिक्रमणांविरोधात सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अतिक्रमणांना तातडीने हटवण्याची मागणी करत, सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) तालुका अध्यक्ष तेजस देवकाते यांनी याबाबत माहिती दिली.

यापूर्वीच्या कारवाया:
यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गलांडवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमणे हटवण्याच्या आणि समाधीस्थळावर मेघडंबरीसह समाधी उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही, अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने स्थानिकांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!