GROWING MAHARASHTRA : पुणे जिल्हा प्रतिनिधी

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना बीअर बार च्या उद्धाटनाला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी वेळ नाही.

पुणे : इंदापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत असुन नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.महाराष्ट्र शासना कडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सुचना दिल्या असताना देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे.एवढे करुन देखील एका बाजूला शेतकऱ्यांना न्याय मिळवत नाही तर दुसरीकडे कृषी मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना बीअर बार च्या उद्धाटन कार्यक्रमातूनच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ मिळत नाही असे चित्र कृषी मंत्र्यांच्याच इंदापूर तालुक्यात दिसत आहे.

इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले नाही तर अनेक शेतकऱ्यांचे पंचनामेच अधिकाऱ्यांनी गायब केल्याचे स्पष्ट होत आहे.या बाबत अनेक शेतकरी अजुन देखील सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना विनवणी करीत असुन देखील हे मस्तवाल अधिकारी असाह्य शेतकऱ्यांची कुचंबणा करीत दारोदार हेलपाटे घालण्यासाठी भाग पाडत आहेत.

शासकीय अधिकारी शासनाचे पैसे शेतकऱ्यांन पर्यंत पोहोचविण्यासाठी आडकाठी आणत असुन याबाबत कोणतीही भूमिका न घेता इंदापूरचे आमदार तसेच राज्याचे कृषी मंत्री असलेले भरणे हे इंदापूर तालुक्यातील बीअर बार ची उद्धाटने करण्यात व्यस्त आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा कोणाकडून ठेवायची हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!