Growing Maharashtra : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गणेश नारंग

पिंपरी -चिंचवड, ११ नोव्हेंबर: आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत पार पडली.प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असून, एकूण १२८ जागा असतील.

निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:महिला आरक्षण: ६३ जागा (४९.२%)
ओबीसी: ३३ जागा (२५.८%, महिला वगळता १७)
अनुसूचित जाती (SC): २२ जागा (१७.२%, महिला वगळता १२)
अनुसूचित जमाती (ST): २ जागा
खुल्या (अ राखीव/सर्वसाधारण): ३५ जागा

आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांनी उमेदवार निवड व रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार असून, स्थानिक समीकरणे नव्याने आकाराला येण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!