Growing Maharashtra
गणेश नारंग : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी–दापोडी–बोपखेल मंडळातील व्यापारी आघाडीचे नवीन अध्यक्ष म्हणून मनिष नानिक पंजाबी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या निवडीचा व्यापारी तसेच सामाजिक स्तरावर उत्साहाने स्वागत होत असून, वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या एकमुखी विश्वासावर ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांमधील समन्वय वाढवणे, त्यांच्या अडचणींना प्रशासनापर्यंत पोहोचवणे, स्थानिक व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि पक्षाच्या विकासमुखी कार्यक्रमांची पोहोच अधिक वाढवणे — या सर्व बाबींसाठी ही निवड महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांशी सतत संपर्कात राहून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे पंजाबी यांच्या निवडीला अधिक बळ मिळाले आहे.
निवडीनंतर बोलताना मनिष पंजाबी म्हणाले,
“पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचा मान राखत, व्यापारी बांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करेन. संघटना मजबूत करण्यासाठी आणि विकास व पारदर्शकता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहीन.”
या नियुक्तीमुळे व्यापारी समाजात नवीन उर्जा आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली असून, पुढील काळात व्यापारी आघाडीचे कार्य अधिक सक्षम व प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8793981431

