Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

पिंपरीगाव येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ या महिलांसाठीच्या विशेष उपक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून दणदणीत प्रतिसाद दिला. मनोरंजन, लकी ड्रॉ आणि संगीताच्या माध्यमातून रंगलेल्या या कार्यक्रमाने परिसराला उत्साहाने भारावून टाकले.कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले पहिल्या बक्षिसातील Activa स्कूटर. विनम्र परिस्थितीत राहणाऱ्या विजेत्या माय-माउलींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला.

याशिवाय फ्रीज, LED टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर, कपाट, सिलाई मशीन, ऑव्हन, कुलर अशा अनेक भेटवस्तू महिलांना प्रदान करण्यात आल्या. सुरेल संगीत मैफिलीने सोहळ्याची मजा आणखी वाढवली.समारंभात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा विशेषत्वाने मांडत कुणाल दिलीप साठे यांनी उपस्थित महिलांना ठोस संदेश दिला—“कोणी चुकीच्या नजरेने पाहिलं किंवा त्रास दिला तर त्वरित विरोध करा! परिस्थिती काहीही असो, मी तुमचा भाऊ–मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे.”मालेगावमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा उल्लेख करत त्यांनी महिलांना स्वसंरक्षणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

तसेच 24 तास मदतीसाठी उपलब्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.आनंद, सांस्कृतिक रंगत आणि महिलांच्या हक्कांविषयीची जागरूकता — या तिन्हींचा सुंदर संगम असलेला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम पिंपरीगावामध्ये विशेष ठसा उमटवून गेला.

बातमी व जाहिराती साठी संपर्क : 8793981432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!