Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

काळेवाडी परिसरातील उच्च शिक्षित, नामांकित वकील आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेले अँड. मंगेश मच्छिंद्र नढे यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी–चिंचवड शहर युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाली असून या नियुक्तीचे परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे.

अँड. नढे यांनी शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, कौशल्यविकास, तसेच युवकांच्या प्रगतीसाठी सातत्याने राबवलेल्या उपक्रमांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्या या निवडीमुळे काळेवाडी व आसपासच्या भागातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून युवा मोर्चाच्या कामात नवचैतन्य येईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.

अँड. नढे हे गेल्या काही वर्षांत काळेवाडी परिसरात

महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग,

युवकांसाठी रोजगार व मार्गदर्शन उपक्रम,

समाजविकास, शिक्षण आणि सुरक्षितता यांसाठी काढलेले उपक्रम,
यामुळे ओळखले जात असून त्यांच्या लोकाभिमुख कार्याला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत आहे.

युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अँड. नढे म्हणाले की,
“पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. युवक आणि समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक उपक्रम राबवणे हेच माझे ध्येय आहे.”

अँड. मंगेश मच्छिंद्र नढे यांच्या या नियुक्तीमुळे पिंपरी–चिंचवडमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास अनेक वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
8793981432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!