Growing Maharashtra
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरीतील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीला गेल्या अनेक महिन्यांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर अखेर समाधानकारक तोडगा निघाला आहे. सतत वाढणारी अडचण आणि रहिवाशांची दिवसेंदिवस बिघडत जाणारी परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्षम नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी हा मुद्दा प्राधान्याने हाताळला आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद साधत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.
या पाठपुराव्यानंतर सोसायटीला तीन नव्या पाण्याच्या लाईनचे कनेक्शन मंजूर करून देण्यात आले असून, सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून टंचाईचा त्रास कमी झाला आहे.
नगरसेवक आसवानी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पिंपरी–चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची गंभीरता दाखवून दिली. प्रशासनानेही सकारात्मक भूमिकेतून तातडीने कार्यवाही करून कामाला गती दिली.
सोसायटीला भेट देऊन नगरसेवक आसवानी यांनी
– पाण्याचा कमी दाब
– अडथळे व तांत्रिक त्रुटी
– अपुऱ्या सुविधांचा अभाव
या सर्वांचा आढावा घेतला. भविष्यात ही समस्या पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पाणीपुरवठा सुरळीत झाल्यावर सोसायटीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांनी नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
8793981432
