Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी विजयनगरमध्ये मध्यरात्रीचं भयावह चित्र समोर आलं आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या पट्ट्यात चोरट्यांनी इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकला की स्थानिक नागरिक आणि पोलिस दोघेही अवाक झाले आहेत.२७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास, एप्पल प्रकृती बिल्डिंगमधील शॉप नंबर १—एसएस सिक्युरिटी या दुकानावर चोरट्यांनी लक्ष्य साधलं. दुकानाचे कुलूप जबरदस्त सफाईने उघडण्यात आलं आणि काही क्षणांतच कपाटे फोडून आत ठेवलेला सुमारे १३ तोळे सोनं आणि रोखरक्कम, असा लाखोंचा मुद्देमाल त्यांनी उचलून नेला.घटनेनंतर परिसरात प्रचंड पेच निर्माण झाला आहे.

नागरिक संतापाने थेट प्रश्न विचारत आहेत—“इथली पोलिस गस्त नेमकी कुठे गायब होते? एवढं धाडस चोरट्यांना मिळतं तरी कुठून?”सलग वाढत चाललेल्या चोरींच्या घटनांनी काळेवाडीची सुरक्षा व्यवस्था डळमळीत झाल्याची भावना जनतेत बळावत आहे. अनेकांनी अंधार पडल्यानंतर रस्ते भयाण वाटत असल्याचंही स्पष्टपणे सांगितलं.

दरम्यान, दुकानाबाहेरील कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा झाले आहे. त्यावरून आरोपींची हालचाल, त्यांचा मार्ग आणि संभाव्य ओळख यावर जलद तपास सुरू असल्याची माहिती मिळते.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासाची धुरा API निलेश नलावडे सांभाळत आहेत.काळेवाडीत एकच सूर आळवला जातोय—“दरोडेखोरांना लवकर पकडा! आणि परिसर पुन्हा सुरक्षित करा!”

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8793981432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!