Growing Maharashtra
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक २२ मधून इच्छुक उमेदवार म्हणून भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांनी आपला अर्ज भाजपचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे यांच्या कडे सादर केला.
सुशिक्षित, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांशी जवळून काम करणाऱ्या या तरुणाला भाजप संधी देते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून मोरवाडी पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज उत्साहात पार पडली. या प्रक्रियेत भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांनी आपला अधिकृत अर्ज दाखल करत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला.
अर्ज दाखल करताना शहर भाजपचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे नेतृत्व आणि अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पक्षाच्या मार्गदर्शनाखाली कागदपत्रांची पडताळणी, अर्ज तपासणी आणि आवश्यक माहिती देण्याची प्रक्रिया शिस्तबद्धरीत्या पार पडली.
अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील युवा पिढीसाठी भक्कम नेतृत्व उभे करण्यात ॲड. मंगेश नढे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचे संघटन कौशल्य, कायद्याचे ज्ञान आणि समाजकार्यातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ॲड. नढे म्हणाले,
“भाजपची पारदर्शक व सुव्यवस्थित अर्ज स्वीकृती प्रक्रिया योग्य आणि कार्यकर्त्यांशी नाळ जुळवून काम करणाऱ्या उमेदवारांना पुढे आणेल. लोकाभिमुख, विकासाभिमुख सकारात्मक राजकारण करण्याचा आमचा संकल्प आहे.”
भाजपच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काही दिवसांत अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
