Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आज महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहराध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शहरातील अनेक माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.


मुंबई येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या अनेक नेत्यांनी भाजपाची वाट निवडली. या एकत्रित प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, शहर व विधानसभा स्तरावर काम करणारे संघटक, महिला पदाधिकारी तसेच युवक नेत्यांचा समावेश आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


भाजपात प्रवेश केलेले प्रमुख नेते व त्यांची माजी पदे

संजोग वाघेरे – शिवसेना ठाकरे गट, शहराध्यक्ष

उषा वाघेरे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (अजित पवार गट)

प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर (अजित पवार गट)

प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (अजित पवार गट)

नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (शरद पवार गट)

राजू मिसाळ – माजी उपमहापौर (अजित पवार गट)

समीर मासुळकर – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

रवी लांडगे – माजी नगरसेवक (ठाकरे गट)

जालिंदर बापू शिंदे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

अमित गावडे – माजी नगरसेवक (ठाकरे गट)

संजय नाना काटे – माजी उपमहापौर

मीनल यादव – माजी नगरसेविका (ठाकरे गट)

कुशाग्र कदम – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव

प्रसाद शेळे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

विनोद नढे – माजी नगरसेवक (अजित पवार गट)

सचिन सानप – युवासेना जिल्हाप्रमुख

आशा सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेविका

प्रविण भालकर – राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेवक

सद्गुरु कदम – काँग्रेस, माजी नगरसेवक

दादा सुखदेव नरळे – भोसरी विधानसभा संघटक (स्वतः व पत्नी)

डॉ. सुहास कांबळे – प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ

अशोक मगर – अध्यक्ष, घरकुल फेडरेशन

नागेश गवळी – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

दिनेश नढे

बिपिन नानेकर

या एकत्रित पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी भाजपाची पिंपरी चिंचवडमधील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप निर्णायक स्थितीत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.
स्थानिक राजकीय निरीक्षकांच्या मते, हा पक्षप्रवेश पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरण्याची दाट शक्यता आहे.

One thought on “शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!